Thursday, October 14, 2010

भारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका

मागील संघ विषयक - "संघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे." या लेखाला फारच छान प्रतिसाद मिळाला. अनेकांनी Google Buzz वर reshared  केला. एका नामवंत लेखकांनी मला " जर संघ आणि सिमी याची तुलना करायची असे तर सध्याच्या भारता पुढील समस्या आणि संघाची भूमिका" यावर लिही, असे सुचविले. तो प्रयत्न मि येथे करतोय. परंतु मी संघाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे, पुढील सादर केलेले,  विचार हे अधिकृत संघाचे नाही. तसेच काही त्रूटी आढळल्यास कळवावे, मी त्या नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन.

भारत पुढे खालील समस्या प्रामुख्याने आहेत.
१. लोकसंख्या
२. भ्रष्टाचार
३. जातिवाद
४. धर्मवाद
५. प्रांतवाद
६. शिक्षण, आरोग्य, प्राथमिक सुविधांचा अभाव
७. नेतृत्व, दूरदृष्टी अभाव    
८. नक्षलवाद
९. काश्मीर
१०. पूर्वांचल
११. पर्यावरण
१२. बेरोजगारी

१. लोकसंख्या: लोकसंख्या हि समस्या सुद्धा आहे आणि जर प्रयत्न केले, त्याचा वापर केला तर ती एक फार मोठी शक्ती आहे. आज जर भारत देश डॉक्टर ए पी जे कलाम यांनी सांगितल्या प्रमाणे २०२० पर्यंत परम शक्तिशाली, वैभवशाली बनवायचा असेल. तर त्यासाठी हीच लोकसंख्या आपल्याला मदत करणार आहे. आपण वारंवार असे एकले असेल कि भारत २०२० पर्यंत सर्वात जास्त तरुण, क्रयशील  लोकसंख्या असलेला देश असेल. ६०% लोकसंख्या हि १८-४० या वयोगटातील असणार आहे. पण या लोकसंखेचे प्रशिक्षण, गुणात्मक विकास केला पाहिजे. तसेच हे तरुण उच्च दर्जाचे शिक्षण घेतलेले, आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करण्याचे स्वप्न बाळगणारे असले पाहिजे. यासाठी संघ सतत शाखे मार्फत आणि इतर अनेक मार्गाने गुणवत्ता विकासाचे काम करतेय. दररोजच्या शाखेत, निवासी वर्गांमध्ये, शिबिरात सतत Vision 2020 किवां भारत महासत्ता कशी होणार आहे, या विषयी कार्यकम उदबोधन, चिंतन होते. एकदा विचार द्यायचे, दूरदृष्टी द्यायचे काम झाले, कि पुढील गोष्टी सोप्या होतात. संघ प्रार्थनेत हा निर्धार, हे लक्ष सांगितले आहे  "परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं". (leading this nation of ours to the highest pinnacle of glory.)
आपला उज्वल इतिहास, अतिशय प्रगत वैन्यानिक वारसा, वैभवशाली अध्यात्मिक वारसा, महापराक्रमी राष्ट्रपुरुष यांच्या सतत स्मरणाने आणि याच्या सखोल अभ्यासाने आपणही असे भव्य दिव्य करू शकतो आणि केले पाहिजे, हि मनीषा जागृत होते.  या साठी सतत संघात या विषयावर बौद्धिक ( भाषण ) असतात, चर्चासत्रे असतात. प्रगत, विकसित, भारतासाठी कुशल, प्रशिक्षित, ध्येयवादी मानुषबल निर्माण करणे हि संघाची भूमिका आहे.लेखक अमित करपे :  कसबा  IT Milan ( आय टी क्षेत्रातील स्वयंसेवकांचे साप्ताहिक एकत्रीकरण / मिलन ) शाखेचा कार्यवाह आहे.

1 comment:

Anonymous said...

If you are going for finest contents like myself, only go to see this
website every day for the reason that it gives quality contents,
thanks|

my site: pit 2013 (cooshow.nttu.edu.tw)