Saturday, October 09, 2010

After Ayodhya Verdict -- "Ram Mandir"

On 30 Sep 2010 every Indian was waiting for Ayodhya Verdict. And it was so important moment for Indian History.
There was small gathering Kasba Ganpati Mandir. Just check this photo. This was really emotional moment. Both community showed high class of maturity.
३० सप्टेंबर २०१० रोजी आयोध्या संदर्भात निकाल लागला. सर्व माध्यमांनी या विषयी फार नकारात्मक प्रसिद्धी दिली होती. त्यामुळे मि सुद्धा जरा साशंक होतो. समाजातील सर्वांच्या भावना महत्वाच्या, पण इतिहास, संस्कृती याची काय किमत असेल ? सत्य कसे पुघे येईल ? मनात सतत एक प्रश्न होता  !!! आज या सर्व गोष्टीचे किती महत्व ?? सध्याच्या तरुण पिढीला हा विषय महत्वाचा वाटतो का ?? १९९२ ला मला या विषयाचे फार काही कळत नव्हते. पण आज या विशायचे महत्व आहे का ? का मला आणि सर्व भारतातील तरुण पिढीला  प्रगती, विकास हे जास्त महत्वाचे आहे ?
मला वाटते कि मंदिर हे एक प्रतिक आहे. जसे Olympic किवां CWG हे प्रगतीचे प्रतिक आहे, तसेच मंदिर हे राष्ट्रीयत्वाचे आणि त्या साठीचा लढा हे राष्ट्रभक्तीचे प्रतिक आहे. म्हणजे सर्व मुस्लीम हे अराष्ट्रीय  का ? नाही . मग नक्की काय म्हणजे राष्ट्रीय ? राम हा या देशाचा राष्ट्र पुरुष . त्याच्या विषयी आदर म्हणजे राष्ट्रीय आणि बाबर हा परकीय आक्रमक. अरे तो इतिहास बस झाला !!!! ५०० वर्षा पूर्वी काही झाले म्हणून आज भांडण करायची  का ? नाही.
पण इतिहास शिकला पाहिजे, समजला पाहिजे. भूतकाळ हा भविष्यकाळ ठरू शकतो. झालेल्या चुका, अपराध काही शिकवत असतो. पण जर वर्तमान कळत याचा अभ्यास, विचार नाही केला, तर तो मूर्ख पण ठरतो. हा विषय हिंदू आणि मुसलीम अस नाही तर तो राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय ( राष्ट्रदोही ) असा आहे. जसे नवीन शोध काढताना जुने संशोधन मदत करते, जुन्या प्रयोगाचे निष्कर्ष मदत करतात. तसेच नवीन राष्ट्रीय पराक्रम, प्रगती, विकास करताना जुने राष्ट्रीय पराक्रम, यशोगाथा मदत करतात. म्हणून मंदिराला सर्वांनी मदत केली पाहिजे. सर्व मुसलीम बांधवांनी पुढे आले पाहिजे. माध्यमांनी सुद्धा हा विचार केला पाहिजे.

No comments: