Saturday, August 07, 2010

little laziness, costs 400Rs. | थोडा आळस, ४०० रुपये नुकसान

 

मागील एका लेखात आळशी माणूस हुशार असतो, असे सिद्ध करणारा दुसऱ्याचा लेख मी दाखविला होता.  परंतु माझ्या आजच्या अनुभवावरून आळस हा फार महाग असतो, असे मला वाटले.
गेले काही दिवस माझ्या  गाडीचे   ( Baja Discover ) कुलूप अडखळत उघडत होते. दोनदा असे वाटलेही कि दोन थेंब तेल/वंगण  टाकले  पाहिजे. पण कामाच्या गडबडमुळे किवां आळसामुळे मला काही तेल टाकणे जमले नाही. पण काल कार्यालयातून ( Office ) एका कार्यक्रमाला निघालो असता, गाडीचे कुलूप काही केल्या उघडेना. बराच  प्रयन्त केला, शेवटी चावी वाकली, पण कुलूप काही केल्या उघडेना. कार्यक्रमाला उशीर होत होता. मग विचार करून गाडी मी कार्यालयाच्या कुपणा  बाहेर रस्त्यावर लावली, कि जेणे करून मी रात्री येऊन घरी गाडी घेऊन जाऊ शकतो. मग ठरलेल्या कार्यक्रमाला मी रिक्षाने गेलो, आणि तिथून बैठकीला आणि घरी सुद्धा रिक्षाने गेलो. असा साधारण ८०  रुपये खर्च आला. रात्री उशीर झाल्यामुळे किवां आळसामुळे मी काही गाडी परत आणू शकलो नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा रिक्षाने ( परत २० रुपये खर्च ) कार्यालयात पोहचलो, तेव्हा गाडी जागेवर नव्हती. पटकन डोक्यात प्रकाश पडला.
काल गाडी जेव्हा लावली, तेव्हा तो विषम दिवस होता आणि आज सम दिवस आहे. गाडी तळाच्या सम - विषम तारखांच्या तांत्रिक कारणाने माझी गाडी उचली गेली होती :(
मग परत एका मित्रला  पकडले आणि जिथे या उचललेल्या गाड्या आणतात तिथे म्हणजे Modern High School समोर गेलो. झालेला प्रकार थोडक्यात  तिथल्या व्यवस्थापकाला सांगितला. पण तो थोडी माझ्या वर दया दाखविणार होता ? त्याने नियम सांगून एकूण १२०० रुपये होतात से सांगितले. PUC , गाडीचे कागद पत्र नाही त्यामुळे मला फार आवाज करता येत नव्हता. शेवटी तीनशे रुपयात सगळे काही ठरले. महद प्रयत्ना नंतर कुलूप दुसऱ्या  चावीने उघडले. पटकन जाऊन PUC काढला. आणि एका गाडी दुरुस्तीच्या दुकानात जाऊन दोन थेंब तेल टाकले. आणि प्रण केला कि इथून पुढे गाडीची देखभाल नियमित करेण. आणि अगदी काही नाही तरी तेल पाणी वेळच्या वेळी करेण. दोन थेंब तेल न टाकल्या मुळे ४०० रुपयाचे  नुकसान झाले. थोडा आळस फार महागात पडला.

तुमचा कोणाचा असा काही अनुभव आहे का ?
आळस चांगला कि वाईट ?

1 comment:

Abhay said...

Chan Ahe Article , more or less mi sudha tuzhapeksha jast aalshi ahe , but 1 +ve point , tula tuzhi chuk lakshat ali , te sudha ek aarthi chagale ahe