Thursday, July 15, 2010

Traditional Arts and Business in India | नंदी बैल, गोंधळी, वासुदेव

नंदी बैल, गोंधळी, वासुदेव हि सगळी पारंपारिक वेशातील, गावोगावी फिरून पोट भरणी लोक. हि लोक त्यांचा व्यवसाय अजूनही करतात याचे फार आचर्य वाटते, तेवढेच कौतुकहि वाटते. पण अजून दहा वर्षांनी हि लोक हा पारंपारिक व्यवसाय करत असतील का ?
मि असा व्यवसाय करणारांच्या घरी गेलेलो आहे. अठराविश्व दारिद्र काय  असते, ते तिथे दिसते. काही मिरवणूक, सभा, शोभा यात्रा, काही प्रासंगिक सांस्कृतिक कार्यक्रमात यांना बोलावले जाते. आपण सर्व त्यांच्या पाया पडतो, त्यांनी सांगितलेले भविष्य आपण खरे समजतो, त्यांनी सांगितलेले उपाय आपण प्रामाणिक पणे करून बघतो. पण यांचे भविष्य ते काय ? त्याच्यावर उपाय तो काय ?
अनेक   कार्यक्रमात video शूटिंग, प्रकाश किवां  ध्वनी  योजना  किवां इतर कोणत्याही सेवेला आपण योग्य ती किमंत देतो किवा द्यायचा आग्रह करतो. पण या पारंपारिक व्यावसायिक किवां कलाकारांना आपण योग्य तो मोबदला देत नाही.
यांच्या विषयी आदर, श्रद्धा वाटणारे अनेक जन आहेत, असतात.  पण यांच्या भाविषाचा विचार कोणालाही नसेल . देव करो आणि हि कला आणि हा व्यवसाय जगो. मला वाटतंय पुढे  जाऊन हि लोक फक्त चित्रपटात, पुस्तकात, किवां सांस्कृतिक कार्यक्रमात दिसतील . पण ती खरी कलाकार नसतील, तुम्ही आम्ही त्यांचा वेश घालून काम करत असू.

No comments: