Tuesday, October 12, 2010

संघाचे राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सिमी या दोन संघटनेची तुलना राहुल गांधी यांनी केली. एक स्वयंसेवक म्हणून मला वाईट वाटले. पण ते राजकीय वक्तव्य होते, म्हणून दुर्लक्ष करता येऊ शकते. माझ्या अनेक मित्रांना देखील संघाच्या कामाविषयी माहिती कमी आहे, म्हणून हा लेख !
संघाचे  राष्ट्रीय चारित्र निर्माण हे एकमेव काम आहे, आणि यातूनच भारताच्या सर्व अडचणी दूर होतील आणि भारत परत एकदा वैभवशाली होईल. पण मग शाखा या माध्यमातून काय साधणार ? आणि मग ते परिवार, संघ परिवार ते काय असते ? भारताच्या संस्कृतीचा, परंपरेचा आणि इतिहासाचा जा अभ्यास केला तर अनेक गोष्टी लक्ष्यात येतील. आणि हाच दृष्टीकोन ठेऊन कोणत्याही देशाचा अभ्यास केला तर याच गोष्टी लक्ष्यात येतील. जेव्हा जेव्हा भारतीयांमध्ये राष्ट्रीय विचारांची कमतरता उदभवली, राष्ट्रीय विचार क्षीण झाले, तेव्हा तेव्हा भारत देश गुलामगिरीत फेकला गेला. किवां जेव्हा जेव्हा अराष्ट्रीय विचारांचा प्रभाव वाढत गेला तेव्हा तेव्हा अप्रत्यक्ष भारत देश गुलामगिरीत फेकला गेला.  आत्ता गुलामगिरी म्हणजे काय याचे वेगवेगळे अर्थ, दृष्टीकोन असू शकतात. पण अश्या प्रकारे आपल्या देशावर गुलामगिरी परत कधीच येऊ नये यासाठी सतत राष्ट्रीय विचारांचा जागर केला गेला पाहिजे. जर राष्ट्रीय काय आणि अराष्ट्रीय काय हाच जर प्रश्न असेल तर फार अवघड आहे. पण जसे बिसिनेस ची सोपी व्याख्या आहे, कि फायद्यासाठी स्थापन केलीली संस्था. तसेच ज्या ज्या गोष्टीने देशाला (राष्ट्राला) दीर्घ काळापर्यंत फायदा होईल असी गोष्ट.
मग संघ देशाला पैसे मिळून देणारी एखादी संस्था आहे का ? नाही. देशाला चांगली, राष्ट्रीय चारित्र असलेली, राष्ट्र साठी विचार करणारी, राष्ट्र-समाज या साठी त्याग करणारी माणसे तयार करणारी संस्था आहे. हे साध्य करण्याचे मध्यम आहे शाखा !!! काय असते हि शाखा ? सर्व वयातील शिशूना, बालाना,  तरुणांना, प्रौढांना एकत्र आणून एक तास राष्ट्रीय चरित्रासाठी करवयाचे स्थान म्हणजे शाखा. एक तासात काय करायचे ? आणि असा एक तास दररोज दिल्याने राष्ट्रीय चारित्र घडते ? हो !!! मुख म्हणजे माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्याला एकत्र यायला आवडते, तो सतत इतरांकडून शिकत असतो. त्याच्या वर सतत आजूबाजूच्या लोकांचा प्रभाव पडत असतो. A man is known by the company he keeps. हे संस्कार, हा प्रभाव घरी बसून आणि खूप सारी पुस्तक वाचून होईल या बाबतीत शंका आहे. म्हणून खेळ, व्यायाम, सहल, गप्पा गोष्टी, सह भोजन, वेगवेगळे कार्यक्रम या माध्यमातून हे संस्कार करण्याची सोय, जागा, कार्यक्रम म्हणजे शाखा. हे खेळ team-work, सांघिक भावना, विजीगुषु वृत्ती, निर्णय क्षमता, नेतृत्व, प्रसंगावधान, शिस्त, सकारात्मकता, संवाद कौशल्य, नियोजकता  अश्या अनेक गुणांच्या विकासाचे काम करतात. मी अनेक पुस्तकात या खेळांचे महत्व वाचले आहे. Stephen Covey यांच्या 7 Habits of Highly Effective People  पुस्तकात देखील "मी" पेक्षा "आपला" विचार करावयास शिकवणारे खेळ, हे कसे उपयुक्त  असतात हे स्पष्ट सांगितले आहे.  आज अनेक सामाजी आणि आर्थिक अडचणी या "स्वार्थी" मानसिकतेमुळे वाढत आहे. आज अनेक संस्थामध्ये H R Games आणि नाट्य प्रशिक्षणात खेळ हे माध्यम वापरले जाते. मी स्वतः पीडीए ची नाट्य-शिक्षण शिबिरांत अशे खेळ  खेळलो  आहे. थोडक्यात खेळ हे व्यक्तिमत्व विकासाचे मधम आहे, आणि ते शाखेल वापरले जाते.
तुम्ही कधी शाखेत गेलेले आहेत का ? तुमच्या काही शंका आहेत का ? संघा विषयी अजून माहिती जाणून घ्यायची आहे का ? लेख कसा वाटला कळवा !!!!

2 comments:

Unknown said...

Those who donnt know anything about RSS,its a very good article.I will defiantly share it with my friends.
Apart from Rahul Gandhi, media does not have a very good impression about RSS,can you write something about it, and what should we do about it?? Because media also has a big impact on the direction of thinking of people.

Amit Karpe said...

I will definitely try to write more about RSS, which will share more information about RSS, its activities,its challenges & its vision. I am agree with you that media really won't have real information about RSS.