Thursday, August 19, 2010

Website inauguration of Torna Rajgad Nyas | तोरणा राजगड न्यास वेबसाईट उदघाटन

तोरणा राजगड न्यास  Website उदघाटन माननीय दीपक शिकारपुरकर ( Deepak Shikarpurkar ) आणि  प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या हस्ते झाले.
या वेळी दीपक शिकारपुरकर यांनी टी. वी. (TV) आणि दूर चित्र संवाद ( Video Conferencing ) याचा शोध सर्व प्रथम भारतात "संजय" ( महाभारतातील धूतराष्ट्राला कुरुशेत्रातील सर्व प्रसंग सांगणारा संजय) याने लावलेला होता. आज आपल्याला ग्रामीण भागात असे तंत्रन्यान घेऊन जायची गरज आहे. शिक्षणासाठी शहरात येणारे लोंडे, हे तिथेच जर शिक्षण मिळाले तर गावाचा आणि पर्यायाने देशाचा विकास होईल. रोटरी क्लब  ( Rotary Club) दूरस्थ शिक्षण ( Distance Learning ) आणि अन्य इतर मार्गाने असे अनेक प्रयोग करत आहे. नाही तरी मुले महाविद्यालयात किती वेळ जातात आणि तिथे किती  शिकतात ? तर प्रत्येक महाविद्यालयात इतर वेळात काही असे शैक्षनिक उपक्रम करून  घेता येतील का ? एखादा studio उभारून तिथे video recording करता येईल. आणि ते सर्व इंटरनेट किवा फोन मार्फत गावात गावात फोहाच्वता येईल. अशा प्रकारे उपलब्ध साधनांचा उपयोग  करून, वक्तीमत्व विकास किवां समुपदेश करण्या साठी वापरता येईल.
भारतात संगणक हि काही फार नवीन गोष्ट नाही, TIFR ( Tata Institute of Fundamental Research ) मध्ये ४५ वर्षा पूर्वी संगणक वापरण्यात सुरुवात झाली होती. आज मेल, फोन वापरता न येणारा अडाणी ( निरीक्षर ) ठरतो. त्यांचा आदर्श आहे तो बिरबल !!! कारण तो अगदी साध्या गोष्टींचा वापर करतो,  आणि त्यातून काही तरी उपयुक्त गोष्ट घडून आणतो. असेच आज आपल्याला साध्या गोष्टींचा वापर करून रोजगार देता आले पाहिजे. जर आपण कौशल्यावर आधारित शिक्षण देले तर भारता एकही बेरोजगार सापडणार नाही.
या वेळी प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे आपले विचार मांडले. भारतात दहाव्वी पर्यंत १३% मुले पोहचतात, बाराव्वी  पर्यंत  ७% मुले पोहचतात, पदवी पर्यंत २.३% मुले पोहचतात. म्हणजे शिक्षणासाठी खूप काम करावयाची गरज आहे. दूरस्थ शिक्षण ( Distance Learning ) हा विषय फार म्हहात्वाचा आहे. भारतात ४० लाख NGO ( Non-Governmental Grganization किवां  स्वयंसेवी संस्था  ) आहेत. म्हणजे ४०० माणसा मागे १ NGO. यातील ३३ लाख नोंदणी कृत आहेत. पंरतु यातील बर्याच संस्था पैसा आणि धर्मवाद यासाठी असतात. प्रामाणिक संस्था कमी आहेत. समाजसेवा हा व्यापार झाला आहे. भारतात १३% बाळंतपण अयशस्वी ठरतात. भारतात ६३ % मुले हि कुपोषित आहेत. त्यात ९०% मुली कुपोषित आहेत. अजून खूप काम कार्याची गरज आहे. महत्मा फुलेंनी सावित्रीबाई फुले यांना जमिनीवर मुळाक्षरे शिकवली. जेव्हा सावित्रीबाई फुले मुलींच्या शाळेत शिकवायला जायच्या तेव्हा, एका पिशवीत स्वच्छ लुगडे ( साडी ) घेऊन जायच्या. जेव्हा लोकांनी मारलेल्या शेण गोळ्यामुळे साडी खराब  होत , तेव्हा शाळेत येऊन परत  पिशवीतील  स्वच्छ साडी ते घालत. आज देकील अनेक सावित्रीबाई फुले ठीक ठिकाणी अशी कामे करताय. प्रेरणा तीच पण प्रकटत वेगवेगळ्या मार्गाने होत आहे.
डॉक्टर हेडगेवार एकदा म्हणाले होते, आपले हे कार्य समाजाचे समाजालाच देणे असे आहे. ऋषी जसे सूर्याला अर्घ, नदीच्या पाण्याने देतात. ज्यात नदीचे पाणी परत नदीला आपण वाहतो. आपण विशेष काहीही करत नाही.
जर प्रत्येकाने समाज काम करताना अशी भावना ठेवली तर काम खूप वाढेल आणि त्यात  सर्वांचे सहकार्य मिळेल.
या  वेळी संस्थेच्या मुलांनी गाणी म्हणली. तसेच संस्थेची माहिती आणि पुढील संस्थेचे कार्यक्रम, उपक्रम याची माहिती दिली.  तोरणा राजगड परिसर समाजोन्नती न्यास हि नोंदणीकृत संस्था वेळे तालुक्यात दुर्गम आणि मागास लोकांसाठी शिक्षण आणि आरोग्य या विषयात काम करते.  या वेळी http://toranasamajonnatinyas.org.in/ हि वेब साईट सुरु केली. हि साईट समुत्कर्ष इन्फोटेक या संस्थेने तयार केली आहे. Samutkarsha Infotech 
हि वेब साईट Drupal हे  CMS वापरून केली आहे. Drupal विषयी माहिती पाहिजे असल्यास भेटा http://www.amitkarpe.com/search/label/drupal
माननीय प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे, अक्षय डाके, अमित करपे,  माननीय दीपक शिकारपुरकर  आणि  रवींद्र  साठे


माननीय प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे,  माननीय दीपक शिकारपुरकर  आणि  रवींद्र  साठे

For More photo: http://picasaweb.google.com/karpeamit/WebsiteInaugurationOfTornarajgadNyas#

No comments: