Wednesday, August 18, 2010

Report Guru pujan | वृतांत गुरुपुजांचा कार्यक्रम

कसबा नगर  आय टी मिलन चा गुरु  पूर्णिमा वृतांत :
दिनाक - १ ऑगस्ट २०१०, रविवार .
स्थळ : त्वष्टा कासार मंदिर.
कसबा नगर  आय टी मिलन चा  गुरुपुजांचा कार्यक्रम छान झाला. सर्वं गट नायकांनी  खूप छान काम केले. सर्वं जन वेळ देऊन आणि मन लाऊन काम करत होते. आम्ही सलग ३-४ दिवस रात्री १०-११ वाजे पर्यंत एकत्र असायचो. दिलेली कामे किवा संपर्क या विषयी निवेदन त्यांच्या कडून आम्ही घेत आणि आम्ही हि देत  असायचो. सर्वांनी मिळून मिसळून कामे केली. तरीही सुधारणे साठी बराच वाव आहे. प्रार्थना, पद्य या साठी विशेष प्रयान्त करावे लागतील.
ठरल्या प्रमाणे  रविवारी सकाळी आम्ही एकत्र ८:३० वाजता त्वष्टा कासार मंदिरात जमलो. जे काही साहित्य आणायचे ते समजून घेतले आणि परत शेवटच्या संपर्कासाठी भाहेर पडलो. अनेक जन तयार होत होते, तर काही जन आयत्या वेळी काही कामा साठी बाहेर  चालले होते. तर काही जन झोपले होते. परंतु सर्वांना परत परत निरोप देऊन आणि काहीना बरोबर घेऊन, कार्यक्रमाच्या ठिकाणी आणले. अमृत वचन, सांघिक पद्य, वक्त्यांचा परिचय, वयक्तिक पद्य आणि नंतर मुख्य विषय. 
न्यानेश पुरंदरे यांनी खूपच छान सुरवात केली. मी त्यांना या आधी सुद्धा ऐकल्यामुळे मला त्यांच्या विषयी खात्री होती. पण या वेळेस त्यांच्या मनात काही वेगळे होते. कोठेही शिवाजी महाराज किवा सावरकर असा विषय न मांडता, वेगळ्या पद्धतीने त्यांनी विषय मांडला. गुरु पूर्णिमा हि सर्वत्र होते. का होते ? सर्वं ठिकाणी गुरु पूर्णिमा आणि गुरु पूजन कसे होते, हे गुरु पूजन आपल्या संकृतीचा भाग कसा आहे अशी सुरवात झाली. काही ठिकाणी गुरु, बाबा आणि इतर नव-अध्यात्मिक गुरूंचे आणि शीषांचे कसे पूजन होते. अशा ठिकाणी आज काळ गर्दी का वाढतेय .... आधुनिक जीवनाने या नात्याला काय रूप दिले.
संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी काय विचार केला. पहिले संघातील गुरु पूजन कशे झाले. त्या मागील दृष्टीकोन, भूमिका..... भगवा ध्वज , त्याचा इतिहास, परंपरा, त्याग - पराक्रम,  आणि आज मि स्वयंसेवक म्हणून  काय केले पाहिजे. अतिशय सकारत्मक रीतीने आज मि समाजात काय करू शकतो. संघे आधीक आणि अधिक काम कशे करू शकतो. अजून कोणी कोणी समाजात काम केले आहे. मग राजस्थानात राजेंद्र सिंग यांनी IIT नंतर कशी पाणी जतन (कोलाड) साठी सुरवात केली. आणि हनमंतराव बाविस्कर यांनी डॉक्टर झाल्या नंतर कोकणात विंचवाच्या दंशावर लस का आणि कशी शोधली. आणि डॉक्टर अभय बंग आणि यांनी का स्वतःला  गडचिरोली मध्ये झोकून दिले . आणि एका विशेष हिवतापामुळे होणारे  हजारो मृतू कमी केले. स्वरूप वर्धनी आणि  व्हेले तालुक्यातील तोरणा परिसर न्यास अश्या संस्थेच्या  कामांची  उदाहरणे दिली.
शिक्षणाचा  उपयोग समजासाठी . विशेषतः आय टी मध्ये असलेल्या मुलांनी कसा विचार करता येऊ शकतो, काय केले पाहिजे, हे अतिशय योग्य  शब्दात  मांडले. भरपुर  पगार फार काळ आनंद देऊ शकत नाही आणि, अश्या सामाजिक कामातून समजा बद्दलची कर्तव्य भावना खूप समाधान देऊ शकते, आणि जी आज आवश्यकता आहे. संघाची दीड लाख पेक्ष्या जास्त सेवा कार्ये आहेत. आणि हे काम अजून वाढवायची गरज आहे. आणि यासाठी अजून वेळ देणारे कार्यकर्ते पाहिजेत. 
वरील सर्वं उदाहरणामुळे आम्हा सर्वांना खूप काम करण्यासाठी चांगली प्रेरणा मिळाली . भगव्या ध्वजाची प्रेरणा  संघ कामाला आणि चागल्या कामाला मिलो असे म्हणून विषय थांबवला.
मुख्य शिक्षकाने ध्वज पूजन करून  दाखवले, आणि त्या प्रमाणे  सर्वांनी पूजन केले. या वेळी नियुक्त्या घोषित केल्या. ( movie club - सतीश हजारे, गण शिक्षक - सुनील पासलकर, सी डि library - समीर कोडीलकर, संपर्क प्रमुख - तेजस देशपांडे, पुस्तक library - शिवराज वडके, महाविद्यालीन विभाग प्रमुख - सिद्धार्थ वाईकर , सेवा प्रमुख - नरेंद्र दांडेकर )  आणि नंतर प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
३६ जनाचे पूजन झाले आणि दोन जने हे अभ्यगत होते. अशी संख्या ३८ असली तरी, एकूण संख्या ४० म्हणता येऊ शकेल. कारण २ जने क्लास मुळे कार्यक्रमातून परवानगी घेऊन निघून गेले.  समीर कोडीलकर याच्या घरी चहा पानाचा कार्यक्रम छान झाला. खूप  छान  गप्पा झाल्या. सर्वांना परत न्या.पु. याच्याशी बर्याच गप्पा मारायच्या होत्या, पण वेळे अभावी परत भेटावयाचे ठरून आम्ही वेगळे झालो.  २-३ दिवसाच्या धावपळी नंतर , कार्यक्रम छान झाला हे बघून समाधान वाटले.

कसबा नगर IT मिलन - गुरुपूजन उत्सव पत्रक  : http://www.amitkarpe.com/2010/07/it.html

Posted via email from Amit Karpe's Life Streaming

No comments: