Monday, July 12, 2010

आणि स्पेनने वर्ल्ड कप जिंकला :)

गेले दोन आठवडे आम्ही मित्र फुटबॉलच्या आजाराने ग्रस्त होतो. घरच्यांना फुटबॉल काय आणि क्रिकेट काय त्यांच्या टीवी वरील मालिकांना अडचण म्हणजे अश्या स्पर्धा. बाकी काय ! अगदी सुरवातीला एखादा सामान्य फुटबॉलरसिका प्रमाणे मी ब्राझीलने जिंकावे आणि ब्राझीलच जिंकणार ( फार तर फार आर्जेन्टिना ) अशा मानसिकतेमध्ये मी होतो. पण एका  नन्तर एक असे धक्का दायक निकाल लागत गेले. पण ज्यांना युरो कप आणि इतर स्पर्धे बद्दल माहिती होती, त्यांना हे निकाल विशेष वाटले नाही. आणि प्रत्येक खेळा नंतर माझा आवडता संघ बदलत गेला. विशेषता जेव्हा Brazil and Argentina हरली तेव्हा मी नाराज झाहलो होतो. [ Nerthlands Vs Brazil (2:1) आणि  Germany Vs Argentina  (4:0) ]. नंतर काही विचारंशी, जो संघ उत्तम खेळ दाखवेल त्याला माझा पाठींबा असे मत बनले. आणि तो पर्यंत मला स्पेन विषयी विशेष माहिती नव्हती. पण ज्या दिवशी स्पेन ने जर्मनीला ( ०: १ ) हरवले , तेव्हा पासून मी माझा पाठींबा स्पेनला देऊ लागलो. त्यांची नेट वरती सर्व माहिती वाचली. त्यांच्या क्लबचा आणि युरो कप चा इतिहास वाचला. स्पेनच्या आर्थिक  संकटा विषयी सुद्धा कळाले. आणि मनोमन देवाला प्रथांना केली कि स्पेन जिंको. ( पॉल ऑक्टोपस चा भाकीत खर ठरो, जरी अश्या गोष्टीं वर माझा विश्वास नसला तरी :)
मी आणि माझे मित्र स्पेनला पाठींबा द्यायचे ठरून, खेळ बघायचे ठरवले. सुरवाती पासून दोन्ही संघ आक्रमक होते. पण गोल कोणालाच करता  येत नव्हता. काहीच्या मते खेळ रंजक नव्हता, कंटाळवाणा होता. पण माझ्या मते जसे सचिनचे एकेरी, दुहेरी धावसाठींचे फटके जसे खेळाची रंजकता आणि सुंदरता, कलामक्ता वाढवतात तसेच स्पेनचे संघाचे बॉल वरील नियंत्रण आणि सांघिक खेळ हि खेळाची गुणात्मक उंची वाढवतात. मला या संघातील नियोजन, संघिक्ता, एकमेकांकडे बॉल पास करण्याची वेळेची सूचकता यांनी विशेष प्रभावी केले. काळ खेळताना बर्याच Free Kick  (चुका), पाडा पाडी झाली. अनेकांना पिवळे  Card आणि एकाला लाल Card मिळाले. पण यात Netherlands संघाची निराशा, राग, चिडचिड दिसून येत होती. खरोखर दोन्ही संघांनी अप्रतिम खेळ केला. दोन्ही संघात चांगले आक्रमक / बचाव्त्मक खेळाडू होते. गोल रक्षकांचे तर विशेष कौतुक केले पाहिजे. तरीपण स्पेन सरस आहे हे दिसत होते. बॉल त्यांचा नियंत्रणात जास्त वेळ होता. पण खेळ जास्तीच्या वेळेपर्यंत जाऊन हि काही यश मिळत नव्हते. दोन्ही संघातील निराशा चांगलीच दिसून येत होती. Arjen Robben (Netherlands) या खेळाडूने तर referee शी हुज्जत घातली आणि त्याला पिवळे card मिळाले. हा खेळ penalty shootout मध्ये जाऊ नये हीच इच्छा होती.  Nerthlands च्या अनेक आक्रमक चाली हाणून पडल्या. त्यांनीच बर्याच चुका केल्या. त्यांचे खेळाडू एकटेच पुढेजाऊन गोल करण्याचा प्रयत्न करत होते. ते अज्जिबात पासिंग करत नव्हते. आणि त्यांचे सर्व प्रयत्न वाया जायचे.
स्पेनचा  David Villa आणि Netherlands चा  Wesley Sneijder  यासारखे Golden Boot चे दावेदार सुद्धा काही करू शकत नव्हते. १५  मिनिटांचा वेळ दोनदा वाढूनही कोणीही गोल करू शकत नव्हते. हि लढाई अति तटीची होती. प्रत्येक क्षण मी श्वास रोखून बघत होतो. एवढ्यात एक जोरदार चाल स्पेनच्या खेळाडूंनी केली, त्यात गती, उत्स्हः, नियंत्रण, चापल्य, समतोल, संयम या सर्व गुणांनी उक्त अशी ती खेळी / चाल होती. आणि अगदी शेवटच्या क्षणाला Andres Iniesta  या  खेळाडूने गोल केला आणि मी जोरात आनंदाने ओरडलो :)  काय गोल होता तो ?? आंद्रेस ने T-Shirt काढून आनंद व्यक्त केला. मी सुद्धा सुटकेचा श्वास सोडला. जवळ जवळ २-३ तास  ज्याची वाट बघत  होतो, तो गोल खेळाच्या ११६ व्या मिनिटाला झाला होता.
आणि स्पेनने वर्ल्ड कप जिंकला :)

1 comment:

Meghraj said...

Some countrymen having attitude of non expecting reality or perception of considering and accepting whatever is being happened around, will lead them to lose. Exactly happened with Brazil and Argentina.